माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर, यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क येथे दिनांक ०3 ते ०७ जानेवारी २०२० दरम्यान होणाऱ्या १९ वर्षा खालील मुले व मुलींच्या शालेय 65व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धाची नगरच्या वडियापार्क येथील बॅडमिंटन हॉल मध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण देशातून आज सायंकाळ पर्यंत 35 पैकी 29 संघ नगर शहरात दाखल झाले आहेत. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन झाले असून स्कुल गेम फेडरेशन चे निरीक्षक अजय मिश्रा यांच्या मार्गदर्शना खाली नियोजन होत आहे, अशी माहिती स्पर्धा संयोजक, जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांनी दिली
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची निवास व्यवस्था अहमदनगर येथील बडी साजन मंगल कार्यालय, इंद्रप्रस्थ संस्कृतीक भवन व केशर गुलाब मंगल कार्यालय येथे आणि भोजन व खेळण्याची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे केली आहे.
65व्या राष्ट्रीय स्पर्धे साठी वडियापार्क येथील बॅडमिंटन बॅडमिंटन हॉलचे बॅडमिंटन हॉलचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत नूतनीकरण करण्यात आले. बॅडमिंटन हॉल समोरील दोन्ही बाजूस पार्कीग फरशी बसवण्यात आली आहे.मुख्य इमारतीसमोरील जागेवर स्पोर्टस् सॅपलिंग प्रकारासाठी सुविधा व संरक्षक ग्रील बसवण्यात आले आहे. संकुल परिसर रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्यात आले आहे.
उद्या सायंकाळी 4 वाजता मंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री शंकरराव गडाख, मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत व सर्व खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
तरी नगरवासी ,नागरिक, क्रीडा प्रेमी, खेळाडू यांना चुरशीच्या अटीतटीच्या या स्पर्धा पहाण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यत येत आहे
Post a Comment