‘बाह्यवळण’ वर मालट्रक उलटला ; सहा तास वाहतूक ठप्प


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहराबाहेरून जाणा-या बाह्यवळण रस्त्यावर निंबळक शिवारात या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे खताच्या गोण्या वाहून नेणारा 16 टायरचा मालट्रक शुक्रवारी (दि.3) सकाळी रस्त्याच्या मध्यभागीच पलटी झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक तब्बल 6 तास ठप्प झाली होती. दोन क्रेनच्या सहाय्याने हा अवजड मालट्रक रस्त्यावरून हटविल्यानंतर दुपारी वाहतूक सुरळीत झाली.

बाह्यवळण रस्त्यावर नगर – कल्याण महामार्ग ते नगर-मनमाड महामार्गाला जोडणार्‍या निंबळक बायपास रस्त्यावर शुक्रवारी (दि.3) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मालट्रक उलटला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु सुमारे सहा तासांपासून या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पुण्याहून येणारी जड वाहतूक नगर-मनमाड महामार्गाला जाण्यासाठी केडगाव बायपास चौकापासून या निंबळक बायपास रस्त्यावरुन वळविलेली आहे. या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खताच्या गोण्या वाहून नेणारा 16 टायरचा मालट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे सहा तास ठप्प झाली. यामुळे कल्याणरोडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा ट्रक नगर – मनमाड मार्गेकडे राजस्थानला चालला होता. दोन क्रेनच्या साह्याने मालट्रक बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर दुपारी या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post