भुतकरवाडीत मोटारसायकली पेटविल्या



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- रात्रीच्या वेळी घरासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मोटारसायकलींवर कोणीतरी अज्ञात समाज कंटकांनी ज्वलनशील पदार्थ टाकून मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना बुधवारी (दि.8) पहाटे 3.30 च्या सुमारास सावेडी परिसरातील भुतकरवाडी येथील भिंगारदिवे मळ्यात घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, ज्ञानदेव भाऊसाहेब कळमकर (रा.भिंगारदिवे मळा, भूतकरवाडी) यांची पॅशन प्रो कंपनीची मोटारसायकल (एम.एच.16, ए.डब्ल्यू. 5920) तसेच त्यांचे भाडेकरू सुरज गोरखनाथ जाधव (मूळ रा.गोंधळे गल्ली, माळीवाडा हल्ली रा.भिंगारदिवे मळा भूतकरवाडी) यांची कायनेटीक कंपनीची बॉस ही मोटारसायकल एम.एच.16, एस.3048) ही घरासमोर रस्त्याच्या कडेला उभी केली असता पहाटेच्या सुमारास कोणी तरी अज्ञात समाजकंटकाने कळमकर यांच्या गाडीवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून मोटारसायकल पेटवून दिली. या आगीत कळमकर यांची मोटारसायकल जळून खाक झाली तर जाधव यांच्या मोटारसायकलीचा पुढील भाग पूर्णपणे जळाला. कळमकर व जाधव कुटुंबियांनी मोटारसायकलीला लागलेली आग विझवली.




याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कळमकर यांच्या माहितीवरुन जळीताच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई तोफखाना पोलीस हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post