माझे तिकीट फडणवीस- महाजनांनी कापले : खडसे


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : मुलीच्या पराभवास व आपले तिकीट कापण्यात पक्षातील लाेकांचा हात असल्याचा आजवर आराेप करणारे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आता थेट त्या नेत्यांची नावेच जाहीर केली. एका वृत्तवाहिनीशी बाेलताना खडसे म्हणाले, 'मला तिकीट मिळू नये म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी काेअर कमिटीच्या बैठकीत नकारात्मक अहवाल दिला. या कमिटीतील माझ्या जवळच्या मित्रांनीच मला ही माहिती दिली,' असा गाैप्यस्फाेट खडसे यांनी केला.

'जे. पी. नड्डा यांच्यासाेबत झालेल्या बैठकीत मी त्यांना ही सर्व माहिती दिली अाहे. त्यांनी कारवाईचे अाश्वासन दिले तरी माझे समाधान झालेले नाही. मात्र मी भाजप साेडणार नाही,' असे खडसे म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post