कितीही खाल्लं तरी भूक न भागवणारे 'या' पदार्थांचे सेवन टाळाच!
माय अहमदनगर वेब टीम
कितीही खाल्लं तरी भूक न भागवणारे काही घटक आहेत. याची माहिती घेतली आणि सेवन टाळलं तर बरेच लाभ मिळवता येतील. आज यासंबंधी माहिती घेऊयात...
1) चायनीज खाद्य पदार्थ तात्पुरती भूक भागवतात. या पदार्थांमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) चा समावेश असतो. यातील रासायनिक घटकांमुळे तात्पुरती भूक भागते मात्र काही वेळातच पुन्हा जेवण्याची गरजही भासते.
2) पांढरा ब्रेड मैद्यापासून बनवलेला असतो. यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. म्हणूनच ब्रेड खाल्यावर काही काळानं भुकेची जाणीव होते.
3) बरेचजण ज्यूस पिणं पसंत करतात. मात्र ज्यूस पिल्यानंतरही लगेचच भूक लागते. ज्यूसमध्ये पल्प अथवा फायबर नसतं. यामधील साखरेचं रक्तातील शर्करेचं प्रमाण तात्पुरतं वाढतं. मात्र तेवढ्याच झटक्यात कमी होतं. पर्यायानं लगेचच भुकेची जाणीव होते. हे टाळण्यासाठी ज्यूसऐवजी स्मुदी घ्यावी.
4) फास्ट फूड बनवताना ट्रान्स फॅटचा वापर होतो. ही सामग्री तात्पुरत्या स्वरूपात पोट भरल्याची जाणीव देत असली तरी काही वेळातच पुन्हा भूक लागते. फास्ट फूडमध्ये विशिष्ट पदार्थांचा वापर जास्त असतो. त्यामुळेच या पदार्थांबरोबर पाणी जास्त प्यायलं जातं. पाण्याच्या अतिरिक्त सेवनानं पोट भरल्यासारखं वाटतं पण लगेच भूक लागते.
Post a Comment