चोरट्यांची पोलिसांना नववर्षाची सलामी; सावेडीत लाखोंचा ऐवज लंपास
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सावेडीतील गावडे मळ्यात चोरीत चोरट्यांनी सव्वासात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांनी पोलिसांना नववर्षाची सलामी देत ही चोरी केली आहे. अमित बुरा यांच्या घरात ही चोरी झाली असून त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अमित बुरा हे एकविरा चैाका जवळील गावडे मळ्यात राहत असून घर बंद करून कुटुंबासमवेत पुणे येथे नातेवाईकाकडे गेले असता चोरट्यांनी यावर पाळत ठेऊन राञी स्वयंपाक गृहाचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात असलेली 42 हजार रूपयांची रोख रक्कम व पावणे सात लाखांचे सोन्याचे दागिने असा सव्वा सात लाखांचा ऐवज लंपास केला.
चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळी तोफखाना पोलिसांनी डॉग पथक पाचारण करून घरातील चावीच्या वासाने रक्षा नावाच्या डॉगने पिंपळगाव माळवी फाट्यापर्यंत माग काढला. तेथून पुढे चोरट्यांनी वाहनांचा वापर केला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. वर्ष भरातील सर्वांत मोठी चोरी झाल्याने पोलिसांसमोर एक प्रकारे नवीन वर्षाचे एक मोठे आव्हान उभे केले आहे
Post a Comment