गॅस कटरने शटर कापून सेंट्रल बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न ; गोळीबार केल्याने चोरटे पळाले


माय अहमदनगर वेब टीम
शेवगाव - तालुक्यातील बोधेगाव येथील सेंट्रल बॅंकेचे एटीएम गॅस सेंट्रल बॅंकेचे एटीएम तोडून रोकड लुटण्याचा चोरटे प्रयत्न करीत होते. या दरम्यान ग्रामस्थांनी हवेत गोळीबार केल्याने चोरट्यांनी गॅस, कटर आदी साहित्य जागीच टाकून पलायन केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. घटनेची माहिती मिळाताच, घटनास्थळी पोलिस पोहचले.

बोधेगाव येथील शेवगाव-गेवराई राज्य मार्ग नजीक येथील हुंडेकरी नगर येथील भागातील सेंट्रल बँकेचे लगत असलेले एटीएम गॅस कटरने तोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी रविवारी पहाटे तीन ते चार साडे चारच्या सुमारास घडला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की बोधेगाव येथे सेंट्रल बँके लगत असलेले एटीमचे शटर दरोडेखोरांनी गॅस कटरने तोडून आत प्रवेश करून आतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आवाज आल्याने दररोज बँकेच्या दारात असलेला पाळीव कुत्रा जोर-जोराने ओरडत मालकाच्या घरी जाऊन कुत्रा जोराने ओरडत असल्याने काहीतरी गडबड असल्याची शंका आल्याने एटीम मध्ये रोजनदारीवर कामावर असलेल्या

साहिद शेख व बाबा सय्यद हे दोघे मामा भाचे बँकेच्या दिशेने जात असताना कुत्रा पुढे पुढे धावत ओरडत होता सदर प्रकार बँकेच्या लगत राहत असलेले व बँकेच्या जागा मालक सामाजिक कार्यकते प्रभाकर काका हुंडेकरी यांना दिली त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हुंडेकरी यांनी स्वतःच्या रिवल्व्हर मधून गोळीबार करताच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले तर त्यांनी दरोड्यात वाफरण्यासाठी आणलेल्या दोन गॅस टाक्या व आदी साहित्य जागीच टाकून दिले घटनेची माहिती मिळताच तात्काळ बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे पो हेड कॉ वामन खेडकर,पो ना अण्णा पवार, नामदेव पवार, हरी धायतडक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून वरिष्टना घटनेची माहिती दिली रविवारी सकाळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक मंदार जावळे स्थानिक गुन्हा शाखा, श्वान, ठसे तज्ञ पथक दाखल झाले श्वान लगतच घुटमळले व दरोडेखोर लगतच्या कपाशीच्या शेतातून पलायन केल्याचा पोलिसांचा कयास आहे पोलिसांनी दरोडेखोरांचे साहित्य ताब्यात घेतले बँकेचे शाखाधिकारी दिगंबर कदरे यांच्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्यांचा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाळीव कुत्र्यामुळे दरोडेखोरांचा सुगावा

पाळीव कुत्रा बँकेतील रोजनदारीवरील कर्मचारी अकबर सय्यद असून लगतच त्याचे घर आहे तसेच त्यांचा भाचा साहिद शेख हा एटीएमची देखभाल करीत आहे दोघा सोबत दररोज हा कुत्रा बँकेच्या परिसरात राहतो त्याचा नित्याचा हा प्रकार आहे एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आवाजाने कुत्रा जोरजोराने ओरडून मालकाच्या घरी घुटमळत चकरा मारू लागला त्याच्या आवाजाने त्याचा मामा बाबा सय्यद हे जागे झाले कुत्रा बँकेच्या दिशेने जोर-जोराने ओरडून घुटमळून होता संशयामुळे दोघे बँकेकडे गेल्याने हा प्रकार उघडीस आला मुक्या प्राण्यामुळे बँकेची होणारी लूट उघडीस आल्याने याची जनतेत जोरदार चर्चा होती रविवारी हा कुत्रा बँकेच्या परिसरात रुबाबात फिरत होता.

दरोडेखोरांनी नियोजित हा कट रचला होता मात्र कुत्र्याच्या सतर्कता व प्रभाकर हुंडेकरी यांनी रिवल्व्हर मधून गोळीबार केल्याने दरोडेखोरांनी पोबारा केला.

सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून पोलीस त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post