विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शनिदर्शन!


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ११) रात्री शनिदर्शन घेतले. तत्पूर्वी, औरंगाबादला जात असताना फडणवीस नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. नगर शहर भाजपच्या वतीने त्यांचे स्वागत शहराध्यक्ष दिलीप गांधी यांनी केले. आ. बबनराव पाचपुते, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सुनिल रामदासी, किशोर बोरा, वसंत राठोड आदी उपस्थित होते.

फडणवीस यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिला. शहर भाजपतर्फे सत्कार स्वीकारताना काही क्षणात ते पुढील प्रवासासाठी औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी काल मुलाखती झाल्या. जिल्हाध्यक्षपदाचा निवडीचा चेंडू प्रदेशच्या कोर्टात आहे. याबाबत फडणवीस काही सूचक विधान करतील, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु फडणवीस यांनी सूचक मौन पाळले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये फडणवीस यांच्या मौनबाबत संभ्रमाचे आणि गोंधळाचे वातावरण आहे.

त्याचप्रमाणे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज नगरमध्ये फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीस महाविकास आघाडीच्या सरकारबाबत करत असलेल्या विविध विधानाचा थोरात यांनी समाचार घेतला. फडणवीस यांना चांगल्या भविष्यकाराची गरज असल्याची बोचरी टीका थोरात यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post