इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगरचे शुक्रवारी उद्घाटन


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अहमदनगर फिल्म फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ अहमदनगर 2020 तयारी पूर्ण झाली असून 3 ते 5 जानेवारी या कालावधीत हा महोत्सव माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन जवळ या ठिकाणी होणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते अ. भा. म. चित्रपट महामंडळ सल्लागार अनिल गुंजाळ, महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नाट्य परिषद अध्यक्ष अमोल खोले, मनपा सहायक आयुक्त मेहेर लहारे, उद्योजक गौतम मुनोत, आदेश चंगेडिया, श्रेणीक शिंगवी, अनिल जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती निमंत्रक आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान यांनी दिली.

गौतम मुनोत एल. एल. पी. प्रायोजित अहमदनगर फिल्म फाऊंडेशन आयोजीत, अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 3, 4, 5 जानेवारी 2020 रोजी माऊली सभागृहात होणार आहे. या महोत्सवात जगभरातील 38 देशांमधून 180 चित्रपटकर्मी यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या महोत्सवाचे प्रोग्रामिंग डायरेक्टर, प्रसिध्द चित्रपट समीक्षक प्रा. संतोष पाठारे यांच्यासह न्यु आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचे संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख प्रा. संदीप गिर्‍हे, प्रा. अनंत काळे आणि दिग्दर्शिका वैशाली केंदळे यांच्या निवड समितीकडून महोत्सवासाठी चित्रपट आणि लघुपट निवडण्यात आले आहेत. अनेक विषयांचे विविध धाटणीचे लघुपट आणि चित्रपट अहमदनगरमधील रसिकांना या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहेत असा विश्वास अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवचे स्वागताध्यक्ष जेष्ठ अभिनेते बलभीम पठारे यांनी व्यक्त केला.

अहमदनगरमध्ये जागतिक चित्रपटांची रुची निर्माण व्हावी या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत, चित्रपट निर्माते गौतम मुनोत यांच्या पाठबळामुळे हे आयोजन अधिक चांगले होण्यास सहकार्य लाभले आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मौलिक पाठबळ लाभले आहे अशी माहिती प्रशांत जठार यांनी दिली. चित्रपट महोत्सव समारोप आणि पारितोषिक वितरण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली, आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते, अ. भा.म. चित्रपट महामंडळ प्रमुख कार्यवाह अभिनेते सुशांत शेलार, राज काझी, मनपा उपायुक्त सुनील पवार, चित्रपट निर्माते, गौतम मुनोत, डॉ. संतोष पोटे, श्रीकांत कुलांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. असे स्वागताध्यक्ष बलभीम पठारे यांनी सांगितले.

या महोत्सवामुळे नगरमध्ये चित्रपट संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे. कलावंत, तंत्रज्ञ यांच्या बरोबरीने सुजाण प्रेक्षक घडण्याची प्रक्रिया सुरू होईल असे विराज मुनोत यांनी सांगितले.

या महोत्सवास नगरकर प्रेक्षकांनी, नाट्य चित्रपट सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञ यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे अहमदनगर फिल्म फौंडेशन यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

महोत्सव यशस्वी करण्यासाठी विराज मुनोत, प्रा. कौस्तुभ यादव, सारंग देशपांडे, पियुष कांबळे, सिद्धी कुलकर्णी, क्षमा देशपांडे, अमोल खोले, शैलेश थोरात, गणेश लिमकर, प्रितम होणराव, मंगेश जोंधळे, शैलेश देशमुख, राहुल उजागरे, स्वप्नील नजान, प्रशांत गुळवे, उद्धव काळापहाड, तुषार देशमुख, साक्षी व्यवहारे, खुशबू पायमोडे, तुषार चोरडिया, सिद्धांत खंडागळे, सुदर्शन कुलकर्णी, पोपट पिटेकर, वसी खान, अक्षय देशपांडे, मयुर गोडळकर, प्रा. योगेश विलायते आदी पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post