अहमदनगरमध्ये गांजा पकडला; दोघांना अटक



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- विनापरवाना अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाची वाहतूक करणार्‍या एकास कोतवाली पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडील हिरवट रंगाचा सुका गांजा किंमत अंदाजे 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.7) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास केडगाव बायपास चौकाजवळ कांदा मार्केटकडे जाणार्‍या रोडवर केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, केडगाव शिवारातील केडगाव बायपास चौकाजवळ कांदा मार्केट लगत 2 इसम मोटारसाकलला बॅग घेऊन काहीतरी अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन पोलिसांनी मंडल अधिकारी उमेश गावडे यांच्या पथकासह केडगाव बायपास चौकात कांदा मार्केटकडे जाणार्‍या रोडवर सापळा रचला. रात्री साडेआठच्या सुमारास मोटारसायकल क्रमांक एम.एच.02, ए.एक्स.6228 वरुन दोन इसम येताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना आडवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव मझहर रहिम खान (वय 33, रा.पठाण कॉम्प्लक्सचे मागे, भाजी बाजार, घोडनदी, शिरुर, जि.पुणे) व सागर रामचंद्र धानापुरे (वय 19, एस.टी.कॉलनी, सूर्यनगर, तपोवन रोड) असे सांगितले. पोलिसांनी त्यांना बॅगमध्ये काय आहे, अशी विचारणा केली असता त्यांना काही एक माहिती दिली नाही. यावरुन पोलिसांनी त्यांना झडती देण्यास सांगितले असता त्यांनी झडती देण्यास नकार दिला. व स्वत:चीच झडती घेण्याची संमती दिली. यावर पोलिसांनी त्यांच्याकडील गोण्यांची झडती घेतली असता त्या पिशवीमध्ये ओला-सुका गांजा आढळून आला. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी काही एक माहिती दिली नाही. यावरुन पोलिसांनी त्यांच्याकडे 10 हजार 500 रुपये किंमतीचा केशरयुक्त विमल असे नाम असलेले कापडी पिशवीतील 2 किलो 100 ग्रॅम वजनासह असलेला प्रतिकिलो 5 हजार रुपये किंमतीचा सुका गांजा व हिरवट रंगाच्या पिशवीतील 4 किलो 968 ग्रॅम वजनाचा ओला-सुका गांजा किंमत अंदाजे 24 हजार 690 एवढ्या किंमतीचा गांजा असा एकूण 35 हजार 190 रुपये किंमतीचा मुद्देमाल व 10 हजार 500 रुपये किंमतीचे दोन मोबाईल, एक मोटारसायकल (क्र.एम.एच.02, ए.एक्स.6228) असा मुद्देमाल जप्त केला व दोघांनाही ताब्यात घेतले.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पो.कॉ. प्रमोद लहारे यांच्या फिर्यादीवरुन गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 (ब) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वाघ हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post