मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडय़ाने सर्बियाची मॉडेल अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकसोबत साखरपुडा केला आहे. लवकरच दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.
हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो पोस्ट करून नताशासोबतच्या ‘एन्गेजमेंट’ची माहिती दिली आहे. एका फोटोत नताशा तिची साखरपुडय़ाची अंगठी दाखवत आहे तर, दुस-या फोटोत हे जोडपे एका ‘चीअर मोमेंट’मध्ये दिसत आहे. हार्दिकने नताशासोबतच्या फोटोला ‘मै तेरा, तू मेरी जाने, सारा हिंदुस्तान’ अशी कॅप्शन देत नात्याची जगजाहीर कबुली दिली.
हार्दिकच्या फोटोवर युझवेंद्र चहल, अर्जुन कपूर, पंखुरी शर्मा, सिद्धेश लाड, पूर्णा पटेल, सोफी चौधरी, क्रिस्टल डिसूझा यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एका जहाजावर हार्दिकने साखरपुडा केला. त्यानंतर काही तासांनी साखरपुडय़ाचा फोटो शेअर केला.
हार्दिक पंडय़ाचे यापूर्वी, अभिनेत्री इशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम यांच्याशी जोडले गेले होते.
Post a Comment