हिंदी अध्यापक संघाच्या पुणे विभागीय कार्याध्यक्षपदी प्रा. सुभाष चिंधे यांची निवड
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरातील शिशु संगोपन संस्थेच्या महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सुभाष निवृत्ती चिंधे यांची राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या पुणे विभागाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी ही निवड केली. प्रा. चिंधे गेल्या 17 वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत आहेत. हिंदी अध्यापक संघाच्या पुणे विभागाचे समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हिंदी हा विषय सक्तीचा करण्यात यावा, यासाठी आपण शासनदरबारी लढा उभारणार असल्याचे चिंधे यांनी सांगितले. हिंदी ही राष्ट्रीय भाषा असतानासुद्धा तो विषय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ऐच्छिक विषय केला आहे. त्यामुळे अनेक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये हिंदी विषय शिकविला जात नाही. हा विषय सक्तीचा केला जावा, यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहर-जिल्हा व जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे चिंधे यांनी सांगितले.
Post a Comment