जिल्हा न्यायालयात वकिलांच्या संरक्षणणासाठी पोलीस बंदोबस्त वाढवा ; वकील संघटनेची मागणी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर– जिल्हा न्यायालयात वकिलांच्या कक्षात मंगळवारी अॅड. अख्तार सय्यद यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध आज दुपारी शहर वकील संघटनेच्या वतीने करण्यात आला. वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे यांनी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांना वकिलांच्या संरक्षणसाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा या मागण्यांचे निवेदन दिले. तसेच बार रूम परिसरात निषेध सभाही घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे म्हणाले, वकील संघटनेचे सदस्य अॅड. अख्तार सय्यद यांना गुंड प्रवृत्तीच्या लववसागर कर्तारसिंग चावला याने वकील कक्षामध्ये बसण्याच्या कारणावरुन मारहाण करून खुर्ची डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. अॅड. सय्यद यांनी बचाव केल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी त्यांच्या डाव्या पायाला व गुडग्याला दुखापत झालेली आहे. अशा प्रकारे पक्षकार वकील कक्षामध्ये येऊन वकीलांवर हल्ला करत असतील तर ही निंदनीय व गंभीर बाब आहे. या घटनेचा वकील संघटना निषेध करीत आहोत. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांना वकिलांच्या संरक्षण बाबत विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यापुर्वी देखील न्यायालयाच्या पार्कीग मध्ये वकिलांना शिवीगाळ व धक्काबुक्की होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. न्यायालयाच्या परिसरात गंड प्रवृत्तीच्या लोकांचा व दलालांचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. याचा बंदोबस्त व्हावा यासाठी न्यायालयामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवा. प्रवेशद्वारावर ओळखपत्र तपासल्या शिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये अशा सुचना देण्यात याव्यात अशी मागणी न्यायधीशांकडे केली आहे. यापुढील काळात अशा घटना होऊ नये यासठी वकिलांनी पक्षकारांना थेट वकिलांच्या कक्षत प्रवेश देणे टाळावे.

यावेळी वकील संघटनेच्या महिला सचिव अॅड. मिनक्षि कराळे म्हणाल्या, न्यायालयामधील महिलांच्या बार रुममध्ये इतरांना जास्त वेळ व कामाशिवाय थांबण्यास परवांगी नाहीये. असा नियम सर्व बारमध्ये करावा.

विशेष सरकारी वकील सुरेश लगड म्हणाले, सरकारने जसा डॉक्टर, पत्रकार यांच्या संरक्षणाचा कायदा केला आहे तसाच वाकीलांचाही करावा अश्या मागणीचा ठराव वकील संघटनेने करून बार कौन्सिलकडे पाठवावा अशी सूचना करत घटनेचा निषेद केला.

सचिव अॅड. अमोल धोंडे म्हणाले, वकिलांना मारहाण करणाऱ्या आरोपीचे कोणत्याही वकिलाने वकील पत्र घेऊ नये अशीसूचना केले.

या निषेध सभेत उपाध्यक्ष अॅड. सुहास टोणे, सहसचिव योगेश गेरंगे, माजी अध्यक्ष अॅड. शेखर दरंदले, अॅड. लक्ष्मण कचरे, लॉयर्स सोसायटीचे सचिव अॅड. रफिक बेग, अॅड. महेश काळे, अॅड. शिवाजी कोतकर, अॅड. संदीप वाडेकर, अॅड. बी.ए. कुंभकर्ण, अॅड. जी.बी. गांधी, अॅड. दीपक वाउत्रे, अॅड. सुनील तोडकर आदींची निषेधाचे भाषणे झाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post