स्वराज्य कामगार संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभाग घेत एमआयडीसी येथील स्वराज्य कामगार संघटनेने एम.आय.डी.सी. ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढून निदर्शने केली.
यामध्ये अध्यक्ष योगेश गलांडे, आकाश दंडवते, दिलीप वाकळे, सुधाकर लामखडे, किसन तरटे, स्वप्निल खराडे, सुनील देवकर, सचिन कांडेकर, दादासाहेब माने, विजय गावडे, आजिनाथ शिरसाठ, दीपक परभणे, संजय बागल, संतोष गव्हाणे, नामदेव झेंडे, संतोष शेवाळे, अविनाश कर्डिले, सुरज कांबळे, अमोल जावळे, राम घुगे, सागर पवार, निलेश शेवाळे, राहूल मेहेरखांब यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एम.आय.डी.सी. मध्ये कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, कामगारांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावावेत, कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घ्यावे, सर्व कामगारांचा आरोग्य विमा उतरविण्यात यावा, महागाई भत्त्यासह किमान वेतन 21 हजार करावे. माथाडी कामगारांना अधिकृत माथाडी बोर्डाकडून नोंद करुन घ्यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
Post a Comment