माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या चेअरमन यांची निवड करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची सभा 31 डिसेंबर रोजी दिग्विजय आहेर, (जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नगर) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चेअरमनपदी आनंदराम मुनोत यांची एकमताने निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी आनंदराम मुनोत यांचे नाव संचालक संजय बोरा यांनी सुचविले व त्यास संचालक विजय कोथिंबीरे यांनी अनुमोदन दिले.
या निवडीप्रसंगी सर्वश्री संचालक हस्तीमल मुनोत, मावळते चेअरमन अजय मुथा, विद्यमान व्हाईस चेअरमन सुभाष बायड, किशोर गांधी, अनिल पोखरणा, आदेश चंगेडिया, संजय बोरा, मोहन बरमेचा, कमलेश भंडारी, संजय चोपडा, अमित मुथा, संजीव गांधी, विजय कोथिंबीरे, श्रीमती मीनाताई मुनोत, श्रीमती प्रमिलाबाई बोरा, सुभाष भांड कर्मचारी प्रतिनिधी संदिप लोढा, अनंत होशिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कटारीया, जॉईंट सी.ई.ओ.नितिन भंडारी आदि उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी दिग्विजय आहेर व त्यांचे सहकारी विक्रम मुटकुळे यांचा बँकेच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. चेअरमन आनंदराम मुनोत यांचा सर्व संचालकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
Post a Comment