महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्राने परवानगी नाकारली




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी राजपथावर विविध राज्यांतील चित्ररथाचे पथसंचलन होत असते. यावेळी मात्र गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाची परवानगी नाकारली आहे. मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथाची परवानगी नाकारण्यात आली आहे.

दरवर्षी प्रमाणे येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत इंडिया गेटजवळील राजपथावर पथसंचलन होणार आहे. यामध्ये निवडक राज्यांच्या चित्ररथांना पथसंचलनाची संधी मिळते. मागील काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ पथसंचलनात झळकताना दिसतो. महाराष्ट्राच्या चित्ररथाने 2015 नंतर दोन वेळा प्रथम क्रमांक मिळवला आहे. मात्र 2020 मध्ये चित्ररथाला सादरीकरण करता येणार काही. मराठी रंगभूमीची 175 वर्ष या संकल्पनेवर यंदाचा महाराष्ट्र चित्ररथ साकारणार होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post