सफाई कामगार हे जनतेचे आरोग्य सांभाळणारे आरोग्य सैनिक - जिल्हाधिकारी


सफाई कर्मचार्‍यांना गणवेश वाटप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महापालिकेचे सफाई कामगार हे शहरातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे म्हणून दररोज साफसफाईचे काम करत आहेत. देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक जसे परकीय आक‘मणापासून देशाचे जनतेचे रक्षण करतात त्याच धरतीवर मनपाचे सफाई कामगार हे शहरातील जनतेच्या आरोग्याचे रक्षण करत असतात. त्यामुळे सर्व सफाई कामगार हे आरोग्य सैनिक आहेत, असे प्रतिपादन महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी केले.

अ.नगर मनपाच्यावतीने 31 डिसेंबर निमित्त सफाई कामगारांना गणवेश वाटप करण्यात आला तसेच नववर्ष स्वागतासाठी स्वरझंकार आर्केस्ट्रा या मनोरंजनात्मक कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहूल द्विवेदी बोलत होते. कार्यक‘मास महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, महिला व बालकल्याण समिती सभापती लताताई शेळके, उपसभापती सुवर्णा गेनप्पा, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सुनील पवार, आरोग्याधिकारी डॉ.अनील बोरगे, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, मनपा कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब मुदगल उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगर शहरामध्ये स्वच्छतेची क‘ांती होत आहे. यासाठी नगरकरांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ, सुंदर, हरित करण्यासाठी सहकार्या करावे. आपल्या शहराची ओळख ही स्वच्छतेवर अवलंबून असते. मनपा कर्मचार्‍यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. आपल्या मनपाचा कामाचा ठसा जनतेसमोर आणा. लवकरच तुम्हाला नगर शहरामध्ये बससेवा मोफत करणार आहे. देशामध्ये आपल्या शहराचा नंबर 50 च्या आत आणावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

उपायुक्त सुनील पवार म्हणाले, नगर शहराच्या स्वच्छतेबरोबर सफाई कामगाराने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांनी स्वच्छतेच्या साहित्याचा वापर करावा. कचरामुक्त शहर करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे.

यावेळी डॉ. अनिल बोरगे यांनी प्रास्तविक केले. तर आभार प्रदर्शन सुरेश भालसिंग यांनी केले. कार्यक‘माचे सूत्रसंचालन अमोल बागूल यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post