मुकुंदनगरमध्ये गोमांस पकडले ;एकास अटक


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – विनापरवाना, बेकायदेशीररित्या महाराष्ट्र शासनाचे बंदीचे आदेश असताना गोवंशीय जनावरांचे मांसाचा साठा करून विक्री करणार्‍या दुकानावर भिंगार पोलिसांनी छापा टाकुन 4 हजार 500 रूपयांचे तीस किलो गोमांसाचे तुकडे जप्त केले. ही कारवाई मुकुंदनगर येथील आर. आर. बेकरीसमोर शुक्रवारी (दि.10) दुपारी 1 च्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मुकुंदनगर येथे आर आर बेकरीसमोर एक इसम गोवंशीय जनावरांच्या मासांची विक्री करत असल्याची माहिती कॅम्प पोलिसांना मिळाली. यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांच्या सुचनेवरून पोलिसांनी छापा टाकुन तन्वीर महंमद कुरेशी (रा. सदर बाजार, भिंगार) यास अटक करून त्याच्याकडील 4 हजार 500 रूपये किंमतीचे तीस किलो गोमांस जप्त केले.

याप्रकरणी पो.कॉ. सुधाकर पाटोळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कलम 269, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 ब, 9अ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस नाईक साठे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post