शंकरराव गडाख मंत्रीपदाच्या संधीचं सोनं करतील- नगरसेवक अविनाश घुले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- सर्वसामान्यांची सेवा, कामाप्रती असलेली तळमळ, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी आक्रमक, मित्रप्रेमी अशा बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले आ.शंकरराव गडाख यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी झालेली निवड ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्याच्या तळमळीने काम करण्याच्या कार्यशैलीमुळेच त्यांना ही संधी मिळाली आहे. या संधीचे ते नक्कीच सोनं करतील. जिल्ह्यातील प्रश्‍न मार्गी लावतील, असे प्रतिपादन नगरसेवक अविनाश घुले यांनी केले.

कॅबिनेट मंत्रीपदी शंकरराव गडाख यांची निवड झाल्यानंतर त्यांचा नगरसेवक अविनाश घुले व माजी सभापती सचिन जाधव यांनी सत्कार केला. याप्रसंगी अजय ढोणे, नितीन मरकड आदि उपस्थित होते.

यावेळी शंकरराव गडाख म्हणाले, प्रामाणिकपणे केलेले काम आणि मतदार संघाचे मोठे पाठबळ यामुळे आपणास मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी करुन जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करु. यासाठी थोरामोठ्यांचे आशिर्वाद आणि मित्रांची साथ मला मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post