नगर क्लबच्या मैदानावर फ्लड लाईटमध्ये क्रिकेटचा थरार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पंजाबी समाज व पंजाबी ऑर्गनायझेशन आयोजित पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके, सहा.पो.नि. प्रविण पाटील, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रा.माणिक विधाते, रणजी खेळाडू अनुप संकलेचा, नगर क्लबचे राजाभाऊ अमरापुरकर, संचालक आगेश धुप्पड, पंजाबी समाजाचे अध्यक्ष गुलशन धुप्पड, जनक आहुजा, अजय पंजाबी, प्रदीप पंजाबी, काकाशेठ नय्यर, ग्वालियरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश मदने, हरजितसिंह वधवा, अमित खामकर, बाबासाहेब गाडळकर, वैभव ढाकणे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी समाजाला जोडण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 14 वर्षापासून साठ वर्षा पर्यंन्त ज्येष्ठ नागरिकांना संधी देण्यात आली आहे. तीन दिवस चालणार्‍या या क्रिकेट स्पर्धेचे नियम मनोरंजनात्मक असून, सर्वांना या क्रेझी क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत गौरव नय्यर यांनी केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा खेळ बनलेला आहे. खेळाचा आनंद घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते. मैदानावर येणारा प्रत्येक जण हा खेळाडूच असतो. स्पर्धामय धावपळीच्या जीवनात नागरिक मैदानापासून दुरावत असून, निरोगी आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी सर्व पंजाबी भाषिक व व्यावसायिकांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आई-वडिलांसह सर्व ज्येष्ठ नागरिक देखील मैदानावर आल्याने लहान मुलांमध्ये देखील मैदानी खेळाची आवड निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके व प्रा. माणिक विधाते यांनी जीवनात मैदानी खेळाची गरज असल्याचे सांगून, असे उपक्रम काळाची गरज बनले असल्याचे स्पष्ट केले. पंजाबी प्रीमीयर लीगचे हे दुसरे वर्ष असून, या स्पर्धेत 10 संघांचा समावेश आहे. दिवसा तसेच रात्री फ्लड लाईटमध्ये या स्पर्धा होणार आहे. नाणेफेक हरणारा फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. एक षटक 5 चेंडूचा असून, प्रत्येक खेळाडूला एक षटक टाकणे बंधनकारक आहे. 15 धावा करणारा फलंदाज रिटायर होतो. अशा अनेक मनोरंजनात्म नियमांचा समावेश या क्रेझी क्रिकेटमध्ये आहे. विजेत्या संघास व उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेंद्र ओबेरॉय यांनी केले. आभार आभार प्रदर्शन सावन छाब्रा यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हर्ष बत्रा, अनिश आहूजा, सागर बक्षी, विशाल बक्षी, मोहित पंजाबी, प्रेटी ओबेराय, चेतन आहुजा, हितेश ओबेरॉय, रोहन धुप्पड, सनी आहुजा, राजेश सबलोक, बलजित बीलरा, मनयोग माखिजा, अभिमन्यू नय्यर, सनी आहुजा, अर्जुन मदान, पियूष जग्गी, जतिन आहुजा, रितेश नय्यर, मनप्रीत धुप्पड आदी परिश्रम घेत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post