माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर शहर आगामी काळात कचराकुंडी मुक्त करणार, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शुक्रवारी (दि.3) महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महापौर यांनी केले
शहरातील १०६ पैकी ४५ ठिकाणच्या कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कचराकुंडी मुक्त शहर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आहवान यावेळी महापौर वाकळे यांनी केले. सुका व ओला कचरा असे वर्गीकरण करून कचरा संकलित करावा. ६५ पैकी ५० स्वच्छता घंटा गाड्यांना जीपीएस अॅप बसविण्यात आले आहेत. स्वच्छता अॅपचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही स्वयंसेवी संस्था, शाळा, बचतगट आदींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
गत ३ वर्षापासून स्वच्छता सर्वेक्षणात घसरलेल्या टक्केवारीत सुधारणा करून देशात १० लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या शहराच्या क्रमवारीमध्ये नगर शहराचा देशातील पहिल्या १०० स्वच्छ शहरामध्ये क्रमांक आला आहे. तो आता ५० मध्ये येण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरामध्ये स्वच्छताविषयक उपाययोजना करण्यात येत आहेत.
शहरात घर ते घर कचरा संकलन व वाहतुकीसाठी खासगीकरणातून काम सुरू करण्यात आले आहे. मोकळ्या भूखंडावरील कचरा उचलण्यासाठी कायम कचरा टाकल्या जाणार्या जागांवर स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. पूर्ण क्षमतेने कचरा संकलन व्हावे, यासाठी नवीन वाहनांची खरेदी होत आहे. प्लास्टिक मुक्त शहरासाठी शासनाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी खतप्रकल्प, हॉटेल वेस्ट, मृत जनावरांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमेथानेशन प्रकल्प, मोठ्या मृत जनावरांसाठी विद्युत दाहिनी, ४ छोटे खतप्रकल्प, सेफ्टी टँकमधील उचलण्यात आलेल्या मैल्यावर प्रक्रियेसाठी एफएसटीपी प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी काहींचे काम सुरू झाली आहेत.
स्वच्छता सर्वेक्षणात घसरलेल्या टक्केवारीत सुधारणा करून देशात १० लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या शहराच्या क्रमवारीमध्ये नगर शहराचा देशातील पहिल्या १०० स्वच्छ शहरामध्ये क्रमांक आला आहे. तो पहिल्या ५० मध्ये येण्यासाठी सर्वाचे प्रयत्न अपेक्षित आहे. सरकारी सुट्टी वगळता अधिकारी व कर्मचार्यांना महिनाभर रजा मिळणार नसल्याचे महापौर वाकळे यांनी स्पष्ट केले.
Post a Comment