श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीच्या कामास हातभार - जी.डी.खानदेशे
'रासेयो'च्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सारोळा कासार गावाने लोकसहभागातून खूप मोठे जलसंधारणाचे काम उभे केले आहे. गेल्या ४ वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना या गावात खूप काही शिकण्याची संधी मिळाली आहे. देशाची खरी जडणघडण ग्रामीण भागतच होत असते. या विशेष श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासास हातभार लागत असल्याने राष्ट्र उभारणीचे काम होत असते. असे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशे यांनी केले.
नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्य कॉलेज अहमदनगर, जनता कला महाविद्यालय रुईछत्तीसी, राजर्षी शाहू महाविद्यालय देवळाली प्रवरा, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.खानदेशे बोलत होते. कार्यक्रमास तहसीलदार उमेश पाटील, प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे, प्राचार्य डॉ.सुरेश बाबर, प्राचार्या स्वाती हापसे, माजी प्राचार्य विश्वासराव काळे, सारोळा विद्यालयाचे प्राचार्य सावकार शिंदे, उपसरपंच जयप्रकाश पाटील, उपप्राचार्य एल.आर. हराळ, प्रा.आर.जी.कोल्हे, अरुणाताई काळे, प्रा.पोपटराव काळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार उमेश पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिरांच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षात सारोळा कासार गावात मोठे काम उभे राहिले आहे, या गावाला मोठा वारसा आहे, तो जपण्याचे काम ग्रामस्थ सातत्याने करत आहेत. येथील जलसंधारणाचे झालेले मोठे काम पाहून समाधान वाटले. या कामामुळे हे गाव पाणी टंचाई मुक्त होणार आहे.तालुक्यातील इतर गावांनी या गावाचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.
प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. भारती दानवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.बाळासाहेब फुलमाळी यांनी केले. तर प्रा.संदीप भणगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास बाजार समितीचे निरीक्षक संजय काळे, ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, संजय पाटील, बाळासाहेब धामणे, गणेश काळे,सतीश कडूस, रामचंद्र धामणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. श्रमसंस्कार शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. मच्छिंद्र मालुंजकर, प्रा.संदीप भणगे, प्रा.निलेश लंगोटे, प्रा.नम्रता ढूस, प्रा.मोनिका रणसिंग,प्रा.शंकर बोरुडे, प्रा.सोनाली काळे, डोळस, प्रा.घोलप यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment