आदेश मिळाल्यास पाकव्याप्त काश्मीर मिळविण्यासाठी कारवाई करू - लष्करप्रमुख


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कर प्रमुखपदी निवड झाल्यानंतर शनिवारी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना ते म्हणाले की, पाक व्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा एक भाग आहे असा संसदीय ठराव आहे. संपूर्ण प्रदेश आपल्याला मिळावे अशी संसदेची इच्छा असेल आणि आम्हाला या संदर्भात आदेश मिळाल्यास आम्ही नक्कीच कारवाई करू.

जनरल नरवणे म्हणाले की, जम्मू-काश्मिरमध्ये प्रत्येकजण चांगले काम करत आहे. आम्हाला जनेतेचे पूर्ण समर्थन आहे. आम्ही स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे आभारी आहेत. त्यांच्या लष्कराविषयी कोणतीही तक्रार नाहीये. सिमेवर तैनात केलेल्या कमांडरच्या निर्णयाचा सन्मान करावा. लष्कराविरोधात नोंदवण्यात आलेल्या सर्व तक्रारी निराधार असल्याचे समोर आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post