आजपासून रेल्वे प्रवास महागला
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. जनरल ते एसी श्रेणीचा प्रवास यामुळे महागला आहे. प्रती किलोमीटर एक ते चार पैसे अशी वाढ करण्यात आली. यामुळे प्रवाशांना आता जास्त भाडे द्यावे लागेल, लांब अंतराच्या प्रवासावर या भाडेवाढीचा परिणाम अधिक जाणवणार आहे. नवे भाडे एक जानेवारी २०२० पासून लागू होतील.
सर्वसाधारण रेल्वेच्या नॉन एसी सेकंड क्लासचे भाडे किलोमीटरमागे एक पैशाने वाढवण्यात आले आहे. स्लीपर क्लासचे भाडेही एक पैशाने वाढले आहे, तर प्रथम श्रेणीचे भाडे एक पैशाने वाढणार आहे.
मेल एक्स्प्रेस रेल्वेंच्या द्वितीय श्रेणीत प्रवासासाठी आता किलोमीटरमागे २ पैसे जास्त द्यावे लागतील. स्लीपर क्लास तसेच प्रथम श्रेणी प्रवासी भाडे किलोमीटरमागे २ पैशांनी वाढवण्यात आले आहे.
Post a Comment