शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, नाहीतर खुर्च्या खाली करा - रामदास आठवले


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा,मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करा अन्यथा खुर्च्या खाली करा असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. तसेच, त्यांच्या नेतृत्वात बांद्रा पूर्वेत संविधान निवसस्थानापासून बांद्रा जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानासमोर माथा टेकणारे पाहिले पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार संविधानानुसार काम करत आहेत. संविधान रक्षणाचे काम करीत आहे. मात्र काही नेते केंद्र सरकारला बेवड्याची उपमा देऊन टीका करत आहेत मात्र त्यांना माझे सांगणे आहे की, केंद्र सरकार संविधान नुसार काम करत असून आरोप करणाऱ्या नेत्यांनी गारुड्या सारखे वागू नये असा टोला रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता लगावला.



पश्चिम बंगाल मधील दलित असलेल्या नामशुद्र लोकांनी त्यांच्यावर बांग्लादेशात अन्याय होत असल्याने त्यांना भारतीय नागरिकत्व द्यावे अशी मागणी केली होती. तसेच नुकतेच पाकिस्तानात गुरूनानकांचे जन्मस्थळ असलेल्या नानाकाना साहिब या पवित्र गुरुद्वारावर दगडफेक झाली होती. या हल्ल्याच आम्ही तीव्र निषेध केला आहे. मात्र पाकिस्तान,अफगाणिस्तान, बांगलादेश येथील मुस्लिम बहुल देशांत अल्पसंख्याक असलेल्या हिंदू, हिंदू दलित,शीख,बौद्ध, ख्रिश्चन या धर्मीयांवर अत्याचार होतात. त्यामुळे तेथून जीव वाचवून भारतात आलेल्या शणार्थींना नागरिकत्व माणुसकीच्या नात्याने दिले पाहिजे. त्यासाठी नागरीकत्व सुधारणा कायदा असून त्यात पाकिस्तान अफगाणिस्थान आणि बांगलादेशातील मुस्लिमांना वगळले आहे. जर वगळले नसते तर सरसकट या तिन्ही देशातील मुस्लिमांना नागरीकत्व द्यावे लागून देशाची सुरक्षा धोक्यात आली असती. त्यामुळे सुधारित नागरिकत्व कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. असेही रामदास आठवले म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post