'त्या' शेतकर्‍यांच्या कर्जाचा विचार लवकरच करणार – ना.बाळासाहेब थोरात


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पहील्यांदा शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. हे करत असताना एकाही शेतकर्‍याला रांगेत किंवा फॉर्म भरण्याची गरज पडली नाही. त्याचबरोबर 2 लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकर्‍यांचाही प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. दरम्यान नगरमध्ये असतांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. फडणवीस यांना चांगल्या जोतिषाची गरज असल्याचे ते म्हणाले.

संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपालक पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ना. थोरात म्हणाले, मागील वर्षी सर्वसामान्य शेतकरी हा दुष्काळाने होरपळला होता. त्यातून सावरल्यानंतर पुन्हा अतिवृष्टीचे संकट एका मागून एक आलेल्या संकटांमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला होता. अशा पद्धतीने बळीराजा काम करत आहे. म्हणून पुढच्या कालखंडात शेतकरी सुखी झाला पाहीजे. यासाठी आमचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पहील्यांदा शेतकऱ्यांसाठी 2 लाख रूपयांची कर्जमाफी केली आहे. त्यासाठी एकाही शेतकर्‍याला रांगेत किंवा फॉर्म भरण्याची गरज पडली नाही. तरीही अजून शेतकऱ्यांचे प्रश्न शिल्लक राहीले आहेत. त्यानंतर दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाही प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत. त्यांचाही विचार करण्यात येणार आहे. मात्र सरकार तरी किती वेळा कर्जमाफी करणार. यामध्ये शाश्वत उपाय शोधणे गरजेचे आहे. त्यावर राज्य सरकार काम करणार असून पुढच्या काळात हे काम करण्यात येईल. दुधाच्या व्यवसायातही खूप अडीअडचणी असून कष्टही आहेत. या देशात अन्न धान्य परदेशातून आणावे लागत होते. आज हा देश अन्न धान्याच्या बाबतीच स्वयंपुर्ण बनला आहे. यामध्ये आपल्या सर्वांचे मोठे योगदान आहे. शेतीचा काळ बदलत गेला. मोठ्या प्रमाणावर उत्पादने सुरु झाली. आज दुध उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचेही त्यांनी सांगितले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post