शिवम् ग्लोबल स्कुलमध्ये महिला मुक्तीदिन साजरा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- स्त्री शिक्षणाची बिजे रोवणार्या भारतातील पहिल्या महिला शिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केडगावच्या लोंढे मळा येथील शिवम् ग्लोबल स्कुलमध्ये महिला मुक्तीदिन साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या संचालिका श्रेया लोंढे व सौ. अर्चना लोंढे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेतील मुलींनी सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा करत ‘मी ही सावित्री’ चा जयघोष केला. प्राचार्य नंदकुमार शेजुळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिला मुक्ती दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षीका व विद्यार्थिनींनी ‘मला जन्म तरी घेऊ द्या’ ही अर्थपूर्ण कविता सामूहिकपणे सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी कुलकर्णी यांनी केले. तर अश्विनी हारदे यांनी आभार मानले. कार्यक‘मास संस्थेचे अध्यक्ष संतोष लोंढे, अनुराधा लोंढे, संचालक सौरभ लोंढे, शुभम लोंढे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील अध्यापिका मयुरी कुलकर्णी, वर्षा मंदिलकर, अश्विनी हारदे, निलीमा डाके, पूजा दळवी आदिंनी परिश्रम घेतले.
Post a Comment