सोलापूर – नागपूर चार नव्या स्पेशल सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना सुरवात


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- रेल्वे मंत्रालयाने सोलापूर – नागपूर दरम्यान धावणाऱ्या चार नव्या स्पेशल सुपरफास्ट साप्ताहिक रेल्वे गाड्यांना सुरवात केली आहे. नगरमार्गे जाणाऱ्या या रेल्वेस नगरच्या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाड्या जानेवारी ते मार्च पर्यंत धावणार आहेत, अशी माहिती नगर रल्वे स्टेशनचे प्रबंधक एन.पी.तोमर यांनी दिली.

या नव्या रेल्वे गाड्यांबद्द्ल अधिक माहिती देतांना नगरचे मुख्य वाणिज्य निरिक्षक रामेश्वर मीना म्हणाले, सोलापूर – नागपूर दरम्यान धावणाऱ्या चारही रेल्वे गाड्या नगरला थांबणार असून गाडी क्रमांक ०२१११ ही दि. १२ जानेवारी ते २९ मार्च पर्यंत दर सोमवारी सोलापूर हून निघून रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी नगर स्थानकावर येईल. ०२११२ क्रमांकाची नागपूर – सोलापूर ही रेल्वे दि. १३ जानेवारी ते ३० मार्च पर्यंत दर मंगळवारी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी नगर स्थानकावर येईल. गाडी क्रमांक ०२११३ ही सोलापूर – नागपूर रेल्वे गाडी ९ जानेवारी पासून सुरु झाली असून दि. २६ मार्च पर्यंत धावणार आहे. या गाडीचे सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी नगर स्थानकावर आगमन होणार आहे. तर गाडी क्रमांक ०२११४ नागपूर – सोलापूर ही गाडी १० जानेवारी ते २७ मार्च पर्यंत धावणार असून नगर स्थानकावर सकाळी ७ वाजून३८ मिनिटांनी आगमन होईल.

या चारही नव्या सोलापूर –नागपूर स्पेशल सुपरफास्ट रेल्वे गाडीचा जास्तीतजास्त नगरच्या प्रवाश्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post