निरोगी व सुसंस्कारित जीवनासाठी स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - महापौर बाबासाहेब वाकळे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- स्वामी विवेकानंदांचे निरोगी व सुसंस्कारित जीवनाचे धडे अंमलात आणले पाहिजे. नगर शहरामध्ये महापालिकेच्या वतीने स्वच्छतेसंदर्भात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे धडे दिले जात आहेत. नागरिकांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

महापालिकेच्या वतीने स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक कुमार वाकळे, नगरसेवक मनोज कोतकर, रवींद्र बारस्कर, राहुल कांबळे, उदय कराळे, मनोज दुलम, भाजपचे मध्य शहर मंडल अध्यक्ष अजय चितळे, अमित गटने, गणेश नन्नवरे, विलास ताठे, संजय ढोणे आदी. उपस्थित होते

यावेळी बोलताना महापौर वाकळे म्हणाले, प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले राहील आपले शहर स्वच्छ, सुंदर, हरित करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. स्वामी विवेकानंदांनी आजच्या तरुण पिढी समोर आपला आदर्श ठेवलाय. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त सर्व नगरकरांनी नगर शहराची स्वच्छता ठेवण्यासाठी पुढे यावे व आपले नगर शहर भारत देशामध्ये स्वच्छतेसंदर्भात अग्रणी राहील यासाठी प्रयत्न करावेत. स्वच्छता ही शहराची खरी ओळख आहे शहर पुढे घेऊन जाण्यासाठी नगरकरांनी जयंतीचे औचित्य साधून आपल्या नगर शहराच्या विकासासाठी पुढे यावे तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महिला व युवतींनी स्वच्छतेचे धडे अवलंबावे. समाज जागृतीसाठी महिलांचे समाजामध्ये मोठे योगदान आहे. आजच्या युवा पिढीला राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची खरी गरज आहे.असेही महापौर वाकळे म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post