अतितणावामुळे मेंदूवर होतात 'हे' परिणाम?


माय अहमदनगर वेब टीम
सध्याच्या ताणतणावाच्या, धकाधकीच्या जीवनाचा लोकांच्या आरोेग्यावर विपरित परिणाम होत आहे. अशा ताणतणावामुळे मेेंदूवरही वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे अनेक मानसिक समस्याही निर्माण होतात. संशोधकांनी म्हटले आहे की, मध्यमवयीन लोक जर अधिक तणावाखाली राहत असतील तर त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. अशा अत्याधिक तणावामुळे मेंदुचा आकारही आकुंचन पावण्याचा धोका असतो.

ज्या मध्यमयीन लोकांमध्ये तणावासंबंधीचे कार्टिसोल या हार्मोनचे प्रमाण जास्त असते, त्यांच्यामध्ये स्मरणशक्तीसंबंधीची कार्यक्षमता फार चांगली नसते, असे दिसून आले आहे. 40 ते 50 वर्षे वयोगटातील सुमारे 2 हजार लोकांची पाहणी करून याबाबतचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील तणावामुळे कमी होणे आणि यामुळे मेंदुचा आकार आकंचन पावणे या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. टेक्सास युनिव्हर्सिटीच्या सुधा शेषाद्री यांनी सांगितले की, कार्टिसोलचे उच्च प्रमाण हे मेंंदूच्या खराब संरचनेशी संबंधित असते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post