विमानात बसतांना अंधश्रद्धा भोवली ; भरावा लागला १२ लाख दंड
माय अहमदनगर वेब टीम
बीजिंग : श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नाही, असे म्हटले जाते. मात्र, चीनमधील एका व्यक्तीला अंधश्रद्धेमुळे चक्क १२ लाखांचा फटका बसला आहे. येथील अनहुई प्रांतामधील अंकिंग प्रदेशात २८ वर्षीय व्यक्तीला विमान कंपनीने १ लाख २० हजार युआनचा (१२ लाख ३६ हजार रुपये) दंड करण्यात आला आहे.
ही व्यक्ती विमानाने पहिल्यांदा उड्डाण करत असल्याने तिने प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून चक्क विमानाच्या इंजिनमध्ये नाणी टाकल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. चीनमधील यिशो जिल्ह्यातील न्यायालयाने संबंधित प्रवाशाला मागील वर्षी जुलै महिन्यात सुनावणी झालेल्या प्रकरणामध्ये दंड सुनावला होता. मात्र यासंदर्भातील माहिती आत्ता उघड करण्यात आली आहे. न्यायालयाने आपल्या वेबसाईटवर यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर संबंधित प्रकरण समोर आले आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव लू चाओ असे असून त्याने विमानाच्या इंजिनमध्ये नाणी फेकल्याची कबुली दिली आहे. टीएनज्यूशॅन विमानतळावर विमानात बसल्यानंतर आपण हे कृत्य केल्याचे चाओने मान्य केले.
लू चाओ २०१९ साली फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्यांदाच विमानाने प्रवास करण्यासाठी टीएनज्यूशॅन विमानतळावर दाखल झाला. तो विमानात बसला. त्यानंतर विमान उड्डाण करण्याच्या आधी विमान कंपनीच्या कर्चमा-याला विमानाच्या इंजिनजवळ जमिनीवर एक युआनचे नाणे आढळल्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. विमानाच्या इंजिनमध्ये नाणी आढळून आल्याने विमान उडू शकणार नाही, हे स्पष्ट झाले. कंपनीने दुस-या विमानाची सोय करून अडकलेल्या प्रवाशांना पाठवून दिले. यामुळे कंपनीला १ लाख २३ हजार युआनचा म्हणजेच १३ लाख रुपयांच्या आसपास तोटा झाला, असे ‘द साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
Post a Comment