'वाडिया पार्क बॅडमिंटन हॉलला माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे नाव द्या'



नगर विकास मंचची मागणी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : वाडिया पार्क मधील बॅडमिंटन हॉलला जिल्ह्यातील जेष्ठ नेते माजी खा. प्रसाद तनपुरे यांचे नाव देण्याची मागणी नगर विकास मंचाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्याकडे करण्यात आली आहे. मंचाचे निमंत्रक किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबत नुकतीच अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

वाडिया पार्क हे अहमदनगर शहरातील सर्वात मोठे क्रीडा मैदान आहे. याठिकाणी जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉलच्या वास्तू आहेत. शहराच्या आणि जिल्ह्याच्या क्रीडा विश्वात मानाचा तुरा रोवण्याचे काम वाडिया पार्कने केलेले आहे.

याबबत बोलताना काळे म्हणाले कि, वाडिया पार्कच्या मंजुरीसाठी आणि उभारणीसाठी जिल्ह्यातील जेष्ठ नेते माजी खा. प्रसाद तनपुरे यांचे मोठे योगदान आहे. तनपुरे यांनीच तत्कालीन सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच विधानसभेत देखील याविषयावर आवाज उठविला होता. यामुळेच वाडिया पार्कला राज्य सरकारची मंजुरी मिळू शकली हे विसरून चालणार नाही.

नुकत्याच वाडिया पार्क मधील बॅडमिंटन हॉलला राष्ट्रीय स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. आपल्याला या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाला ही खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

ज्या क्रीडा प्रेमी असणाऱ्या तनपुरे साहेब यांच्या मुळे वाडिया पार्कला मंजुरी मिळाली त्या वाडिया पार्क मधील बॅडमिंटन हॉलला “माजी खासदार प्रसाद तनपुरे बॅडमिंटन हॉल” असे नाव देण्यात यावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्याचे मंचाचे निमंत्रक किरण काळे यांनी म्हटले आहे. मागणीच्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, क्रीडा मंत्री ना. सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री ना. अदिती तटकरे यांना पाठविण्यात आल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post