वाडीयापार्कमध्ये बॅडमिंटनचा थरार


65 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेस उत्साहात सुरुवात
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- क्रीडा व युवा सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगरमध्ये होत असलेल्या 19 वर्षाखालील मुले व मुली 65 व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेस शुक्रवारी सकाळी उत्साहात सुरुवात झाली. अनेक संघांमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असल्याने अनेक सामने अतीतटीचे होणार आहेत. क्रीडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर, स्कूल गेम फेडरेशनचे निरिक्षक अजय मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या या स्पर्धेस संपूर्ण देशातून 35 राज्यांचे संघ नगरमध्ये दाखल झाले आहेत. या स्पर्धेनिमित्त वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉलला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरुप देण्यात आले आहे. तसेच वाडिया पार्क बाह्य परिसरही सुशोभित करण्यात आला आहे.

स्पर्धेचे रितसर उद्घाटन सायंकाळी होणार असले तरी सकाळपासून स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सत्रात मुलांच्या स्पर्धा सुरु झाल्या. यात केंद्रीय विद्यालय विरुद्ध पश्‍चिम बंगाल (विजयी), कर्नाटक विरुद्ध तेलंगना (विजयी), हरियाना (विजयी) विरुद्ध विद्या भारती, तामिळनाडू (विजयी) विरुद्ध आसाम, मध्यप्रदेश (विजयी) विरुद्ध पंजाबी, महाराष्ट्र (विजयी) विरुद्ध आंध्रप्रदेश, दिल्ली विरुद्ध बिहार (विजयी), ओरिसा विरुद्ध आयबीएसओ संघ(विजयी), दिव-दमण विरुद्ध छत्तीसगड (विजयी), जम्मू काश्मिर विरुद्ध गुजराथ (विजयी), पाँडेचरी (विजयी) विरुद्ध सीबीएससी स्पोर्ट संघ, छत्तीसगड विरुद्ध हिमाचल प्रदेश (विजयी), झारखंड (विजयी) विरुद्ध गोवा आदिं सामनांचा थरार बॅडमिंटन हॉलमध्ये रंगला.

सामने पाहण्यासाठी क्रीडा प्रेमींनी गर्दी केली आहे. संपूर्ण भारतातून संघ व खेळाडू आल्याने वाडिया पार्क परिसर गर्दीने फुलून गेला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post