'दरबार'ची जबरदस्त सुरुवात, पहिल्याच दिवशी 'तान्हाजी','छपाक'च्या एकुण कलेक्शनपेक्षा दीडपट अधिक राहिली कमाई


माय अहमदनगर वेब टीम
बॉलिवूड डेस्क - शुक्रवारी रिलीज झालेल्या रजनीकांत स्टारर 'दरबार' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर शानदार सुरुवात झाली. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार या चित्रपटाने भारतात जवळपास 32 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. अहवालानुसार, हा आकडा रजनीकांत यांच्या मागील चित्रपटांच्या कमाईच्या अपेक्षेप्रमाणे नाही. पण ही सुरुवात छान आहे.
हिंदी पट्ट्यात 'दरबार' फीका पडला...
'दरबार'ने भारतात 32 कोटींची कमाई केली असली, तरी हिंदी बेल्टमध्ये हा चित्रपट फीका पडला. चित्रपटाने येथे 1.88 कोटी रुपये कमावले असून त्यात हिंदीचे 1.2 कोटी आणि तामिळ आवृत्तीचे 68 लाख रुपयांचे कलेक्शन सामील आहे.

'दरबार'सोबत 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' आणि 'छपाक' हे दोन हिंदी चित्रपटही रिलीज झाले असून या दोघांनीही घरगुती बॉक्स ऑफिसवर अनुक्रमे 16 कोटी आणि 4.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. तुलनात्मक दृष्टीकोनातून पाहिल्यास दरबारचे एकूण कलेक्शन (32 कोटी रुपये) दोन्ही हिंदी चित्रपटांच्या एकुण कलेक्शन (20.75 कोटी रुपये) च्या एकूणच दीडपट अधिक आहे.

रजनीच्या अनेक चित्रपटांच्या मागे राहिला 'दरबार'
'दरबार' पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये विजय स्टारर 'बिगिल' च्या तुलनेत मागे राहिला, जो तामिळ चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 'बिगिल'ने 35 कोटींचा व्यवसाय केला होता. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालात म्हटले आहे की, 'दरबार' रजनीकांतच्या आधीच्या '2.0' आणि 'कबाली' चित्रपटांच्या मागे राहिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post