दहशतवाद्यांसोबत फिरत असलेल्या राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिसाला अटक



माय अहमदनगर वेब टीम
श्रीनगर - राष्ट्रपतीपदकाने सन्मानिक जम्मू-काश्मीरच्या पोलिस अधिकाऱ्याला शनिवारी दोन दहशतवाद्यांसोबत श्रीनगर-जम्‍मू महामार्गावर एका गाडीतून प्रवास करताना अटक केली. पोलिस सुत्रांनी सांगितले की, हे दहशतवादी दिल्लीला जात होते. संवेदनशील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात डीएसपी दविंदर सिंग यांना कुलगाम जिल्ह्यातील वनपोह येथे हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी नवीद बाबू सोबत पकडले गेले. बाबूवर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दक्षिण काश्मीरमध्ये 11 गैर काश्मिरींच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोपा आहे.

दहशतवाद्याच्या हालचालीवर पोलिसांचे होते लक्ष

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जम्मू-कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवल्यानंतर या हत्या करण्यात आल्या होत्या. जेणेकरून सफरचंद उद्योगाला फटका बसेल. पोलिस सुत्रांनी सांगितले की, ते नवीद बाबूच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्याने आपल्या भावाला फोन केल्यानंतर त्याचा ठाव ठिकाणा लागला. पोलिसांनी वनपोह येथे एका गाडीला तपासणा करण्यात आली ज्यामध्ये हिजबुलचा एक दहशतवादी जो की एक माजी विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) राहिला आहे. त्याच्यासोबत आसिफ आणि डीसीपी दविंदर सिंग प्रवास करत होते.

पोलिस अधिकाऱ्याला शौर्यासाठीमिळाले होते राष्ट्रपती पदक

दविंदर सिंगला गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित केले होते. दविंदर सिंग यांना अटक करून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी श्रीनगर आणि दक्षिण काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त केला. हा शस्रसाठा डीसीपी आणि इतर दहशतवाद्यांनी लपवून ठेवला होता.

दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त
श्रीनगरच्या बादामी बाग छावनी परिसरातील दविंदर सिंगच्या घरातून पोलिसांनी एक एके-47 रायफल आणि दोन पिस्टल तर नवीद बाबूने सांगितल्यानुसार अन्य ठिकाणाहून एके-47 रायफल आणि पिस्टर जप्त केले. दरम्यान हा दहशतवादी एका पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीने दिल्लीला का जात होता याचा तपास सुरु असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post