ही तर लबाड सरकारची लबाडी : फडणवीसांचा सरकारवर निशाणा

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - आमडीफाटा/धानला (नागपूर) - केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपाला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात हे सरकार सत्तारूढ झाले आहे. पण, जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार फार काळ चाललेले नाही, हा या देशाचा इतिहास सांगतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील आमडीफाटा आणि धानला येथील सभांमध्ये बोलताना केले.

निवडणुकांच्या काळामध्ये अवकाळीग्रस्तांना 25 हजार रूपये हेक्टरी मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना करीत होती, तर 50 हजार रूपये हेक्टरी मदतीची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी करीत होती. पण, आता शेतकर्‍यांना कोणतीही मदत देण्यास हे सरकार नकार देत आहे. राज्यात आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10 हजार कोटी रूपये शेतकर्‍यांसाठी मंजूर केले होते. आज शेतकर्‍यांची मोठी फसवणूक होते आहे. आज पुन्हा नागपूर आणि परिसरात गारपीट झाली आहे. त्यांनाही मदत दिली पाहिजे. एकिकडे अवकाळीग्रस्तांना मदत मिळत नसताना दुसरीकडे फसव्या जाहिरातीसारखी कर्जमाफी दिली जात आहे. आमच्या काळात 2001 ते 2017 पासूनचे कर्ज माफ केले गेले. यांच्या सरकारने केवळ दोन वर्षांचे कर्ज माफ केले. सप्टेंबर 2019ची अट टाकून अवकाळीग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवले आणि त्यातही अटी-शर्ती लागू असे सांगून जीआर काढला. ही एका लबाड सरकारने केलेली मोठी लबाडी आहे, असेही फडणवीस म्हणाले.
आमडीफाटा/धानला (नागपूर) - केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपाला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात हे सरकार सत्तारूढ झाले आहे. पण, जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार फार काळ चाललेले नाही, हा या देशाचा इतिहास सांगतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील आमडीफाटा आणि धानला येथील सभांमध्ये बोलताना केले.
निवडणुकांच्या काळामध्ये अवकाळीग्रस्तांना 25 हजार रूपये हेक्टरी मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना करीत होती, तर 50 हजार रूपये हेक्टरी मदतीची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी करीत होती. पण, आता शेतकर्‍यांना कोणतीही मदत देण्यास हे सरकार नकार देत आहे. राज्यात आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10 हजार कोटी रूपये शेतकर्‍यांसाठी मंजूर केले होते. आज शेतकर्‍यांची मोठी फसवणूक होते आहे. आज पुन्हा नागपूर आणि परिसरात गारपीट झाली आहे. त्यांनाही मदत दिली पाहिजे. एकिकडे अवकाळीग्रस्तांना मदत मिळत नसताना दुसरीकडे फसव्या जाहिरातीसारखी कर्जमाफी दिली जात आहे. आमच्या काळात 2001 ते 2017 पासूनचे कर्ज माफ केले गेले. यांच्या सरकारने केवळ दोन वर्षांचे कर्ज माफ केले. सप्टेंबर 2019ची अट टाकून अवकाळीग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवले आणि त्यातही अटी-शर्ती लागू असे सांगून जीआर काढला. ही एका लबाड सरकारने केलेली मोठी लबाडी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post