चहाचे 4 फ्लेव्हर्स दूर करू शकतात आरोग्याशी संबंधित चार समस्या
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - काही लोक दररोज एकसारखा चहा पिणे पसंत करतात. मात्र, वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेव्हर्सची चहा फायदेशीर ठरू शकते. असे अनेक संशोधनांमधून समोर आले आहे. जाणून घेऊया तुम्हाला निरोगी ठेवणाऱ्या 4 फ्लेवर्सच्या चहांबाबत...
कोमोमाइल टी : तणावामध्ये
शरीरात सेरोटोनिन आणि मेलेटोनिनचा स्तर कमी होते तेव्हा तुम्हाला तणाव जाणवतो. हा तणाव कमी करण्यासाठी कोमोमाइल चहा घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरात हार्मोनचा स्तर नियंत्रित होतो आणि तणाव लवकर दूर होतो. ज्यांना डिप्रेशन असेल त्यांनाही या फ्लेव्हरचा चहा पिल्याने फायदा होतो.
लॅव्हेंडर : झोप येत नसल्यास
जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा तुम्ही दीर्घ काळापासून या समस्येमुळे त्रस्त असाल तर तुम्ही लॅव्हेंडर चहा प्या. यामुळे तरतरी येईल. तसेच तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला सहजपणे झोप येते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला चहा प्यायला आवडत असेल तर लॅव्हेंडर चहा उत्तम पर्याय आहे.
दालचिनीचा चहा : कोलेस्ट्रॉल वाढल्यास
हा चहा ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यात मदत करतो. हा चहा पिल्याने शरीरात इंन्शुलिन रेझिस्टन्स वाढवतो. भरपूर अँटिऑक्सिडंट्स असलेला हा चहा कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यात मदत करतो. तसेच हृदयासंबंधी आजारांपासून बचाव होतो.
पुदीना : पोट दुखल्यास
ज्यांना मलावरोध, अपचन किंवा पोटदुखीचा त्रास असेल त्यांनी मिंट म्हणजेच पुदिन्याचा चहा घेतला पाहिजे. हा चहा पिल्याने पोटाचे स्नायू सैल होतात आणि पोटदुखीचा त्रास कमी झाल्याचे जाणवते. तुम्हाला जास्त राग येत असेल तर ऑरेंज फ्लेव्हरचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
Post a Comment