अमृत योजनेचे काम बंद पाडणे दुर्देवी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगरः नियमांचा बडगा दाखवून शहराच्या महत्त्वाकांक्षी अमृत योजनेचे काम बंद पाडणे दुर्देवी असल्याची टीका जागरुक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी केली आहे.

नगर शहरांमध्ये अमृत योजनेतून पाईपलाईन टाकायचे काम पुरातत्त्व विभागाने घेतलेल्या आक्षेपांमुळे स्थगित करावे लागले आहे. नगर शहरांमधील ऐतिहासिक पार्श्‍वभूमी पाहता जवळजवळ सर्वच गल्ली बोळांमध्ये ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा आहे; परंतु अनेक पिढ्यांपासून पुरातत्व विभागाने कधी त्याचे जतन योग्यप्रकारे केले नाही. ऐतिहासिक वास्तू भग्न अवस्थेतच राहिलेल्या आहेत. नगर शहराच्या विकासासाठी महत्वाच्या असलेल्या पाईपलाईनचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. अशा योजनेला आक्षेपाचा बडगा दाखवून काम बंद पाडणे योग्य नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

नगर शहरातील अमृत योजनेला कायद्याचा बडगा दाखवून आडवण्याच्या वृत्तीला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगून ते म्हणाले, की कायदा हा नेहमी जनतेच्या भल्यासाठी वापरला जावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post