सर्वसामान्यांना भाजप पक्ष न्याय देऊ शकतो ः राम शिंदे
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर ः भाजप पक्षाने सर्वसामान्य जनतेला उच्चपदापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे. कधीही काँग्रेस पक्षासारखे प्रस्थापित नेत्यांना पदे देण्याचे काम केले नाही. काम करणार्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम भाजप पक्षाने केले आहे. पक्ष संघटनेच्या माध्यमातून पक्षाने अनेक तरुणांना समाजामध्ये सेवा करण्याची संधी दिली आहे. प्रत्येक युवकाने भाजप पक्षाचे ध्येयधोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम करावे. केंद्र सरकारने घेतलेले विविध निर्णय जनतेपर्यंत घेऊन जावे. काम करणार्यांना पक्षामध्ये मोठी संधी मिळत असते. माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला राज्याच्या मंत्रीपदापर्यंत संधी मिळाली आहे. नगर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचा मानही मला पक्षाने दिला आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना कमी वयात मनोज कोकाटे याने राजकारणाच्या माध्यमातून केलेले समाजकारण कौतुकास्पद आहे, यापुढेही तो समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवेल तसेच नगर तालुक्यात पक्ष संघटन वाढवेल याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले.
नगरतालुका भाजप तालुकाध्यक्षपदी मनोज कोकाटे यांची निवड झाल्याबद्दल मा. मंत्री प्रा. राम शिंदे. समवेत उक्कडगावचे सरपंच नवनाथ म्हस्के, मांडवाचे माजी सरपंच सुभाष निमसे, अनुसूचित जातीचे सरचिटणीस विजय गाडे आदी यावेळी उपस्थित होते.
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला कुठलाही राजकीय वारसा नसताना एवढ्या कमी वयात नगर तालुक्यासारख्या जिल्ह्याचे ठिकाण असणार्या तालुक्याचा अध्यक्ष केल्याबद्दल मी पक्षातील सर्व जेष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्या सामान्य जनतेच्या प्रेमामुळे पक्षाने मला या पदावर काम करण्याची संधी दिली, त्या जनतेच्या सेवेसाठी या पदाच्या माध्यमातून 24 तास उपलब्ध असेल असा मी शब्द देतो. लवकरच नगर तालुक्यातील पक्षाची कार्यकारिणी जाहीर करून काम करणार्यांना संधी देणार आहे. पक्ष संघटनेच्या माध्यमातून भाजपपक्ष तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचे काम करणार असल्याचे कोकाटे म्हणाले.
Post a Comment