काेराेना विषाणूमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला संसर्ग


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - काेराेना विषाणूमुळे लाेकांसाेबत चीनच्या अर्थव्यवस्थेला संसर्ग झाला आहे. चीनमध्ये नववर्षाच्या आठवडाभराच्या सुट्यांनंतर साेमवारी उघडलेला शेअर बाजार आपटला. काेराेना विषाणू संसर्गामुळे वाढलेल्या चिंतेमुळे शांघाय शेअर बाजार ७.७२ टक्के काेसळला. चीनच्या शेअर बाजारात चार वर्षांतील ही सर्वात माेठी घसरण आहे. शांघाय कंपाेझिट इंडेक्स २२९.९२ अंक म्हणजे, ७.७२% घटून २,७४६.६१ अंकांवर आणि शेन-झेन कंपाेझिट इंडेक्स ८.४१ टक्के म्हणजे १४७.८१ अंक काेसळून १,६०९ अंकांवर बंद झाला. काेराेना विषाणू पसरल्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेला हाेणाऱ्या नुकसानीसाेबत जागतिक पुरवठा साखळीला सर्वात जास्त नुकसान हाेत आहे. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर हाेत आहे. बाजारात गुंतवणूकदारांमध्ये याबाबत खूप भीती आहे. असे असले तरी चीनच्या नियामक बाजाराला स्थिर करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. रविवारी चीनच्या केंद्रीय बँकेने बाजारात १.२ ट्रिलियन युआन(१७३०० काेटी डाॅलर)ची अतिरिक्त रक्कम टाकण्याची घाेषणा केली. सुट्या सुरू हाेण्याआधी बाजार २३ जानेवारीला खुला झाला हाेता आणि त्या दिवशी शांघाय कंपाेेझिट इंडेक्स २.८ टक्के काेसळला हाेता. चीन सरकार २००८ मध्ये जागतिक मंदी आणि २००२-२००३ मध्ये सार्स आजाराच्या संसर्गानंतर बाजारातील उलथापालथ राेखण्यादरम्यान अशा प्रकारचे पाऊल उचलले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post