या माजी नगरसेवकावर ऑईल चोरीचा गुन्हा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शहरातील एका माजी नगरसेवकासह 8 जणांविरूध्दी अनाधिकृतपणे जागेत प्रवेश करून आपले नुकसान करून ऑईल चोरून नेले यात 48 हजारांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे. ही घटना शनिवारी (दि.1) 10.30 च्या सुमारास घडली.
या प्रकरणी रवी मुकुंदलाल अॅबट (वय-58, रा. औरंगाबाद रोड, बी.टी. आर. गेटसमोर, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हुंडेकरी यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या अंबट यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये माजी नगरसेवक भाऊसाहेब भिमाजी उडानशिवे, अमोल जिजाराम साबळे, दीपक दिलीप जाधव, राजु बबन दिवडे, विकास भाऊसाहेब उडानशिवे व तीन अनोळखी इसम (सर्व रा. रामवाडी) हे अनाधिकृतपणे घुसले. तेथे त्यांनी पत्र्याच्या शेडची कंपाऊंड तोडुन शेडचे नुकसान केले. तसेच तेथे असलेले सर्वो कंपनीचे 48 हजार रूपये किंमतीचे 200 लिटर ऑईल चोरून नेले.
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी रवी अॅबट यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कलम 143, 147, 148, 149, 447, 427, 379 अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार बी. व्ही. काळे हे करीत आहेत.
Post a Comment