भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसास बेदम मारहाण


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाच लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना लालटाकी परिसरातील म्युनिसिपल हडको येथे गुरूवारी (दि.6) सायंकाळी 4.40 वा. घडली.

पोलिस हवालदार बाबासाहेब लक्ष्मण राऊत (वय 55, रा. नेमणुक तोफखाना पोलिस ठाणे) यांना वायरलेसवरून लालटाकी परिसरात भांडणे चालु असल्याचा निरोप मिळाला. त्यानुसार भांडण सोडविण्यासाठी ते त्या परिसरात गेले असता भांडण करणार्‍यांपैकी संदीप नामदेव साबळे (रा. म्युन्सिपल हडको, नगर) याने त्यांच्या सरकारच्या गणवेशाचे बटन तोडुन आतील बनियन फाडुन झटापट केली. तसेच त्यांच्या तोंडावर व दातावर लाथाबुक्यांनी प्रहार केल्याने ते जखमी झाले. तसेच यावेळी साबळे याने राऊत यांना शिवीगाळ करीत त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला.

या प्रकरणी हे.कॉ. बाबासाहेब राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 332, 353, 504, 506 प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगळे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post