जेलमधून पाच कुख्यात आरोपींचे पलायन


माय अहमदनगर वेब टीम
कर्जत
:-कर्जत येथील उपकारागृहाचे सिलिंग तोडत व छताची क़ौले उचकटुन पाच कुख्यात आरोपींनी पलायन केले.

दि.९ रोजी कर्जतच्या जुण्या पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये असलेल्या उपकारागृहात असलेल्या एका बराकितील सहा आरोपींपैकी खून आणि बलात्कार प्रकारणातील पाच आरोपींनी कारागृहाचे छत उचकटुन व क़ौले काढून सायंकाळी सात ते साडे सातच्या सुमारास पलायन केले आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले ज्ञानदेव तुकाराम कोल्हे रा.नानज जवळा ता.जामखेड (गुन्हा ३९४), अक्षय रामदास राऊत (पारेवाड़ी) अरणगाव ता.जामखेड (भादवि ३०२), मोहन कुंडलिक भोरे रा.कवडगाव ता.जामखेड (भादवि३०२), चंद्रकांत महादेव राऊत रा.(पारेवाड़ी) अरणगाव ता.जामखेड (भादवि ३०२), गंगाधर लक्ष्मण जगताप रा.महाळगी ता.कर्जत (भादवि ३७६) अशी पाळालेल्या आरोपींची नावे आहेत. फरार आरोपीच्या तपासासाठी पोलीस विविध पथके रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली.

सदरचे आरोपी खून व बलात्कारा च्या गुन्ह्यात अटक होते, जुन्या पोलीस स्टेशन मध्ये चार बराकी असून यातुन सर्वात शेवटी असलेल्या बराकीत सहा आरोपी होते त्यातील पाच जणांनी बराकीत असलेले सिलिंग प्रथम तोडले व त्यानंतर छताला असलेली कौले उचकटून बाहेर येत पलायन केले छतावरून मागच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहती समोर उड्या मारून हे आरोप पळाले, कर्जत जामखेड या तालुक्यातीलच असलेले हे आरोपी गंभीर गुन्ह्यात अटक होते, कर्जत पोलीस स्टेशन च्या चार बराकित 25 ते 28 आरोपी होते, यातील सर्वात कडेच्या बराकीत हे आरोपी होते, सदर आरोपी पळून जाताना त्यांनी उंच असलेल्या भिंती वरून उड्या मारल्या त्यावेळी पाठी मागे राहणाऱ्या पोलिसांच्या पत्नीनी हे पाहिले मात्र जुन्या गाड्याचे पार्ट कोणी टाकले असतील असे म्हणत या महिलानी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे एका पोलीस कर्मचार्याच्या पत्नीने सांगितले. त्यावेळी त्यांना आरोपी पळून गेल्याबाबतही माहिती नव्हती त्या आपल्या दारातुन वाहत असलेले गटाराचे पाणी व त्यामुळे होणारी रोगराई याकडे लक्ष वेधत ही बातमी देण्याची विनंती आमच्या प्रतिनिधी कडे करत होत्या.

आरोपींनी साधला डाव
पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधीकारी यांचे कार्यालय नगररोड वरील नवीन इमारतीत हलवलेले असताना आरोपी मात्र अद्यापही जुन्या पोलीस स्टेशन मधील पुरातन बराकितच असल्यामुळे व आज रविवारची सुट्टीमुळे हा परिसर अत्यंत सुनसान असल्यामुळे या सर्व परिस्थितीचा फायदा घेत आरोपींनी नेमका डाव साधला. नवीन पोलीस स्टेशनमधील पोलीस कस्टडीमध्ये जुने फर्निचर व फलक ठेवण्यात आले असून त्याचा वापर केला गेला असता तर हा प्रकार घडलाच नसता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post