लग्नानंतर प्रेमसंबंधास नकार देणा-या प्रेयसीचा प्रियकराकडून निर्घृण खून


माय अहमदनगर वेब टीम
परभणी- ऊसतोड करणा-या टोळीतील एका महिलेचे विवाहापुर्वीचे प्रेमसंबंध अखेर तिची जीवनयात्रा संपविण्यास कारणीभुत ठरले. मोबाईलवरून प्रियकराला यापुढे प्रेमसंबंधास नकार देतांनाच शेवटची भेट घेण्यास बोलवलेल्या प्रेयसीला आपला जीव गमवावा लागला. यापुढे ती प्रेमसंबंध ठेवणार नाही, याची खात्री होताच प्रियकराने नारळ तोडण्याच्या कत्तीने प्रेयसीच्या मानेवर व डोक्यावर वार करीत तिला संपविले. मात्र अवघ्या 24 तासात तो पुण्यातून पोलिसांच्या तावडीत सापडल्या. खूनाची कबुली देताना त्याने आपली प्रेमकहाणी ही सांगितली.

रामपुरी शिवारातील यादव यांच्या ऊसाच्या शेतात शनिवारी (दि.8) एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ती महिला ऊसतोड कामगारांच्या टोळीतील असून ती काही दिवसांपुर्वी हरवलेली असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास मानवत पोलिसासोबतच स्थानिक गुन्हा शाखा करत होते. महिलेच्या नातेवाईकांकडून तिच्या फोन संदर्भात या पथकाने मिळवलेल्या माहितीतून भरीव माहिती पथकाच्या हाती लागली. त्यात त्या महिलेचे संबंध लग्नापुर्वी अन्य व्यक्तीशी असल्याचे आढळून आले. त्यानुसार पथकातील कर्मचारी तट्टुजवळा व पुणे येथे रवाना झाले. तेथे संशयीत संजय उर्फ पप्पू रमेश जोंधळे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्या महिलेशी विवाहपुर्वी संबंध असल्याचे कबुल केले. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी हे संबंध असण्याल्या पुष्टी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post