सख्या भावाकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे एकास जिवंत जाळण्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना 28 जानेवारी रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. पांडुरंग अंकुश खोरे (वय 32, रा. काष्टी, ता.श्रीगोंदा) याने दत्तात्रय अंकुश खोरे याच्या विरूध्द श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भादंविक 307 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाची फिर्याद दिली होती. त्याचा राग येऊन दत्तात्रय खोरे याने पोलिसात दिलेली फिर्याद काढुन घे, असे म्हणुन अनिल महादेव मगर (रा. गार, ता.श्रीगोंदा) आणि एक अनोळखी मित्र यांच्यासह पांडुरंग अंकुश खोरे यास मारहाण करून बळजबरीने रॉकेल पाजले व अंगावर ओतले. पांडुरंग हा रॉकेलने पुर्ण भिजल्यानंतर त्याला शिव्या देत दत्तात्रय याने त्याला पेटवुन दिले. यामध्ये अंकुश हा गंभीररित्या भाजला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असुन त्याची प्रकृती गंभीर आहे.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी पांडुरंग खोरे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय खोरे यांच्यासह तिघांवर खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. तपास स.पो.नि. सानप करीत आहेत.
Post a Comment