हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेपला न्याय द्या; चाहत्यांची मागणी


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेप व अ‍ॅक्वामॅन फेम अ‍ॅम्बर हर्ड या दोघांमधील वादाचा फटका डिसी युनिव्हर्सला बसत आहे. डीसीचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून चर्चेत असलेला ‘अ‍ॅक्वामॅन २’ हा सुपरहिरोपट जॉनी आणि अ‍ॅम्बरमधील वादामुळे खोळंबला आहे. अ‍ॅम्बर हर्ड ‘अ‍ॅक्वामॅन’मध्ये मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. मात्र तिची या चित्रपटातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी जॉनीचे चाहते करु लागले आहेत.

जवळपास एक लाख ५० हजारांपेक्षा अधिक लोकांनी ‘अ‍ॅक्वामॅन २’च्या निर्मात्यांना इमेल करुन तिला चित्रपटात न घेण्याची विनंती केली आहे. जर तिला चित्रपटात काम मिळाले तर ही मंडळी ‘अ‍ॅक्वामॅन’वर बहिष्कार टाकणार आहेत. जॉनी डेपच्या चाहत्यांनी दिलेल्या या धमकीमुळे तिला आता चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post