शेतकऱ्यांनो घाबरू नका के.के. रेंज संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडणार : शरद पवार


माय अहमदनगर वेब टीम
पारनेर - देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी आज नवी दिल्ली येथे त्यांच्या सहा जनपथ बंगल्या वर पारनेर नगर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शना खाली पारनेर तालुक्यातील वैष्णोदेवी यात्रेस गेलेल्या सर्व यात्रेकरूंचे व के.के. रेंज संदर्भात पारनेर नगर तालुक्यातून आलेल्या सर्व के.के. रेंज बाधीत सदस्यांचे आज दिल्ली येथील निवास्थानी यथोचित सन्मान केला व पारनेर नगर तालुक्यातील सर्व उपस्थित जनसमुदायास नाश्त्याची व चहा पाण्याची व्यवस्था करत सन्मानित केले.
पारनेर नगर तालुक्यातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर असून येत्या काही दिवसात मी जयंतराव पाटील यांची भेट घेऊन संबंधित अधिकार्‍यांसमवेत पिंपळगाव जोगा मुळा डॅम सह इतर कुठल्या धरणावरून पाणी आणता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.पारनेर नगर तालुक्याच्या पाणी प्रश्नावर चर्चा करणार असून पारनेर नगर व राहुरी तालुक्यातील किमान 23 गावावर आलेले के.के.रेंजचे संकट दूर करण्यासाठी व सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणार असेही शरद पवार साहेब यांनी सांगितले.
आमदार निलेश लंके हे खरोखरच लोकमतातून निवडून आलेले आमदार आहेत. दिल्ली सारख्या ठिकाणी साडेचारशे ते पाचशे लोक घेऊन फिरणारा आमदार यापुढील काळात महाराष्ट्रात एक नवीन इतिहास तयार करेल असे गौरवोद्गार शरद पवार साहेबांनी उपस्थित लंके समर्थकांच्या समोर प्रगट केले.तर खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांनी काल देशाच्या संसदेमध्ये कांदा प्रश्न संदर्भात चर्चा केली व आजही संसदेत अधिवेशना मध्ये आमदार लोकनेते निलेश लंके यांनी कांदा प्रश्ना संदर्भात निर्माण केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की मी आज हा कांदा प्रश्न नक्कीच चर्चेत अनणार आहे.किमान एक तास पारनेर नगर तालुक्यातून गेलेले सर्व यात्रेकरू व के.के. रेंज बाधित शेतकरी यांच्याशी आदरणीय शरद पवार साहेब व खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांनी सविस्तर चर्चा केली व निलेश लंके यांच्या प्रती असणारा जिव्हाळा दाखवला. व आमदार लंके त्यांच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी पारनेर नगर तालुक्यातून गेलेल्या सर्व यात्रेकरूंनी व के.के.रेंज संदर्भात आलेल्या सर्व नागरिकांनी किमान एक तास शरद पवार व सौ.सुप्रियाताई सुळे यांच्याशी खुली चर्चा केली.
शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे, प्रतिष्ठानचे जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र चौधरी,बापु शिर्के, विजय औटी,डॉ. कावरे,श्रीकांत चौरे,सरपंच राहुल झावरे,गणेश साठे,अरूण पवार,सचिन पठारे किशोर गाडे,श्रीकांत पवार बापू रोहकले संदीप सालके,दत्ता कोरडे,संतोष ढवळे,बलभीम कुबडे,सुरज भुजबळ, संभाजी आढाव, पोपट पिसाळ, शरद चौधरी, जयसिंग जरड ,संभाजी जरड, विनायक जरड, संदीप वाघ ,शरद वाघ ,विश्वनाथ वाघ, संदीप चौधरी,संदिप रोहकले,अंकुश मस्के,रमेश रोहकले,नवनाथ रासकर,प्रितेश पानमंद,राजेंद्र खोसे, सुभाष कावरे, अमोल दळवी, रामदास साळवे, टायगर शेख,ह.भ.प. शिवाजी महाराज रेपाळे,नामदेव कावरे,बबन व्यवहारे, सत्यम निमसे, निलेश शिंदे,प्रमोद गोडसे,किरण गव्हाणे,पवन खामकर प्रमोद साठे, नंदु सोंडकर,दत्ता निवडूंगे,सोपान मते भाऊ ठूबे,तान्हाजी आचार्य,सागर मते, पप्पु कावरे, प्राविण थोरात , स्वप्निल कावरे सह पारनेर नगर तालुक्यातील अनेक पं.समीती सदस्य, सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सेवा सोसायटीचे चेअरमन यांच्या सह अनेक तरुण,पदाधिकारी या वेळी सहभागी झाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post