माजी नगरसेवकासह इतरांवरील गुन्हा मागे घ्या


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : येथील माजी नगरसेवक भाऊसाहेब भिमाजी उडानशिवे व अन्य आठ जणांविरुध्द ऑईल चोरीचा खोटा गुन्हा नोंदविला असून तो त्वरीत रद्द करावा अशी मागणी सर्जेपुरा येथील रामवाडी भागातील नागरीकांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी भागवत माधव जगताप, विजय वडागळे, अशोक भोसले, नितीन साबळे, जयेंद्र शेरकर, आकाश मामड, अंजना शिंदे, अजित मोरे, सागर वाकचौरे, कासम पाथरे, उमेश लोंढे, महेशय चलाखे, निखील कोल्हे, सागर पुंडे, गणेश रासने आदी उपस्थित होते.

पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, रामवाडी, सर्जेपुरा झोपडपट्टीतील रहिवासी असून आमचे प्रतिनिधी, पक्ष संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भिमाजी उडाणझिवे (रा रामवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर ) व त्यांच्या 8 सहकार्‍यांविरुध्द ऑईल चोरीचा खोटा गुन्हा नोंदवण्यात आला असून, रामवाडी मधील एका जागेवर अतिक्रमण करुन वहिवाटीचा रस्ता अडविला, तेथील धार्मिक स्थळाचे नुकसान केले, कचरापेटी काढून टाकली आदींबाबत भाऊसाहेब उडाणझिवे यांनी रितसर तक्रार करुन आवाज उठविला अर्थात या प्रकरण भाऊसाहेब उडाणशिावे यांचे वैयक्तिक हित त्यात नसून सार्वजनिक हितासाठी, लोकांसाठी हे कार्य करीत न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नाला आडकाठी आणल्याचा भाग म्हणून संबंधितांनी ऑईल चोरीचा खोटा गुन्हा नोंदवून अनेक कलमे त्यांचेवर लावली आहेत. तरी भाऊसाहेब उहाणशिवे व अन्य 8 जणांवरील गुन्हा रद्द करावा.

उडाणशिवे हे गुन्हेगार नसून सामाजिक कार्यकर्ते आहेत. गेल्या 40 वर्षापासून त्यांचे कार्य सुरु आहे, ते दोन वेळेस नगरसेवक तर त्यांच्या पत्नी एक वेळेस नगरसेविका होत्या, रामवाडी झोपडपट्टीतील नागरी सुविधा देणे, विकास करणे आदि त्यांचे कार्य सुरु आहे, त्यात हा अतिक्रमणाचा प्रश्‍नही त्यांनी स्थानिक रविाशांच्या तक्रारीवरुन मांडला आहे, त्याचा राग धरुन हा वरील खोटा गुन्हा भाऊसाहेब उडाणशिवे व त्यांच्या साथीदारांवर नोंदविला असून संबधितांना हे प्रकरण दडपून टाकण्याचे प्रयत्न असल्याच दिसते तरी सदरचा गुन्हा रद्द करुन न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post