'हा' भारतमातेचा विजय – अरविंद केजरीवाल


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - हा दिल्लीचा नाही तर भारतमातेचा विजय असल्याचं सांगत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधील नागरिकांचे आभार मानले आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत असून अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचं निश्चित आहे. निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर दिल्लीमधील आपच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करत सेलिब्रशन करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात आपचे कार्यकर्ते उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत त्यांचेही आभार मानले.


“दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा आपल्या मुलावर विश्वास ठेवला. हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय आहे. त्या प्रत्येक कुटुंबाचा विजय आहे ज्याने मला आपला मुलगा मानून जबरदस्त समर्थन दिलं. स्वस्त वीज, चांगली शिक्षा मिळत असलेल्या त्या प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे,” असं यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post