अहमदनगर विभागाचे ‘द ग्रेट एक्सचेंज’ सहा पारितोषिकांसह राज्यात प्रथम


महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या 49 व्या नाट्य स्पर्धेत
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्य स्तरीय नाट्य स्पर्धेत अहमदनगर विभागाच्या क्षितिज झावरे लिखीत आणि किशोर पराते दिग्दर्शित द ग्रेट एक्सचेंज या नाटकाने उत्कृष्ट पुरुष कलाकार प्रथम-किशोर पराते, प्रथम क्रमांक दिग्दर्शक किशोर पराते, अभिनय उत्तेजनार्थ-राजू घोरपडे, अभय गोले, नेपथ्य प्रथम क्रमांक -निलेश चांदणे, सौ. शोभा चदणे, सचिन घोडके. या वैयक्तिक पारितोषिकांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे.

सातारा येथे झालेल्या अंतिम फेरीत द ग्रेट एक्सचेंज नाटकाचा अतिशय उत्तम आणि सर्वच स्तरावर दर्जेदार प्रयोग अहमदनगरच्या एस टी. विभागातील कलाकारांनी सादर केला. गेल्या 26 वर्षानंतर दिग्दर्शन आणि अभिनयाचे रौप्य पदकाचा बहुमान किशोर पराते यांच्या रुपात अहमदनगरला मिळाला स्व. अनिल तथा बालिकाका क्षीरसागर यांना 26 वर्षापूर्वी हा मान मिळाला होता.

सोलापूर येथे झालेल्या प्राथमिक फेरीतही या नाटकाने दिग्दर्शन, अभिनय किशोर पराते आणि नाटक प्रथम ही पारितोषिके पटकावली होती. या नाटकाच्या यशात निर्मिती प्रमुख-विजय गिते (विभाग नियंत्रक अ.नगर.) निर्मिती सूत्रधार- सचिन भुजबळ (कामगार अधिकारी.अ.नगर) व्यवस्थापन-कामगार कल्याण समिती (अ नगर.) यांचे होते.

कलाकार अभय गोले, गोविंद पीडियार, राजेश घोरपडे, जयदेव हेंद्रे, सौं.शोभा नांगरे, श्रीमती. स्वरूपा वैद्य, संदीप शिंदे, सुरेश गिते, अरुण वीरकर, बापू शिंदे, जाकिर शेख, काका आवचिते, सचिन घोडके, निलेश चांदणे यांचे महत्वपूर्ण योगदान होते तर जालिंदर शिंदे, सागर मेहेत्रे, नाना मोरे, आबा सैंदाणे, मुन्ना सय्यद, सचिन इंदलकर, सुनील वणवे, शैलेश देशमुख, गणेश लिमकर, अशोक अकोलकर, चेतन ढवळे यांनी तांत्रिक सहकार्य केले.

महाराष्ट्र शासन आयोजित राज्य नाट्य स्पर्धा, बालराज्य नाट्य स्पर्धा, पुरूषोत्तम स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक, थेस्पो करंडक या सहा राज्यातील विविध स्पर्धेत सातत्याने यश यांपाठोपाठ महाराष्ट्र मार्ग परिवहन स्पर्धेतील यश हे अहमदनगरच्या नाट्य सांस्कृतिक क्षेत्रासाठी बहुमान आहे. या शब्दात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अहमदनगर जिल्हा समन्वयक शशिकांत नजान यांनी भावना व्यक्त केल्या.

विजेत्या नाट्य संघाचे नाट्य परिषदेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अमोल खोले, माध्यवर्तीचे सहकार्यवाह सतीश लोटके, नियामक मंडळ सदस्य सतीश शिंगटे, अभिनेते प्रकाश धोत्रे, प्रसाद बेडेकर, बलभीम पठारे, संजय घुगे, श्रेणिक शिंगवी, संदीप दंडवते, स्वप्नील मुनोत, तसेच जेष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी, बाळकृष्ण ओतारी, दीपक घारू, सदानंद भणगे, अनंत जोशी, संजय आढाव, शिरीष जोशी, रसिक ग्रुप चे अध्यक्ष जयंत येलूलकर, बालरंगभूमी परिषद अध्यक्षा सौ. उर्मिला लोटके, नाट्यकर्मी, राहुल सुराणा, शिवाजी कराळे, दत्ता पवार, अनंत रिसे, अविनाश कराळे, राहुल सुराणा, राम पाटोळे, स्वप्नील नजान, दीपक बडवे यांनी अभिनंदन केले आहे.

क्षितिज झावरे लिखित द ग्रेट एक्सचेंज नाटक महाराष्ट्र्र शासन सांस्कृतिक संचालनालय आयोजित राज्यनाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रात प्रथम आणि अंतिम फेरीत विजेते नाटक आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post